
पुणे, 4 नोव्हेंबर (हिं.स.)पुणे महापालिकेच्या हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील शेवाळेवाडी आणि मांजरी परिसरातील मलनिस्सारण व देखभाल दुरुस्ती कामांमध्ये गंभीर त्रुटी आढळल्याने संबंधित शाखा अभियंता आकाश ढेंगे यांना निलंबित करण्यात आले आहे.त्यांची खातेनिहाय चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी दिले आहेत. यापूर्वी टीडीआर प्रकरणात दोन अभियंत्यांचे निलंबन झाले आहे.
महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिवाळीच्या काळात शेवाळेवाडी आणि मांजरी भागाची पाहणी केली होती. त्यावेळी तेथे त्यांना तुटलेले व धोकादायक स्थितीत असलेले चेंबर्स, रस्त्याच्या कडेला असणाऱ्या डक्टची साफसफाई न करणे, त्यामुळे नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला असल्याचा अहवाल प्रशासनाने अतिरिक्त आयुक्तांकडे सादर केला होता. यामध्ये मलनिःसारण विभागाच्या कामकाजात मोठ्या प्रमाणावर निष्काळजीपणा असल्याचे दिसून आले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु