पुणे -मिळकतकर थकबाकीदारांना अभय योजनेचे बक्षीस
पुणे, 4 नोव्हेंबर (हिं.स.)पुणे महापालिकेची निवडणूक अवघ्या दोन-तीन महिन्यांवर येऊन ठेपलेली असताना महापालिका प्रशासनाने मिळकतकराच्या थकबाकीदारांसाठी अभय योजना राबवून ‘बक्षीस’ देण्याची तयारी सुरू केली आहे.अभय योजना मंजूर करण्यासाठीचा प्रस्ताव महापालिक
पुणे -मिळकतकर थकबाकीदारांना अभय योजनेचे बक्षीस


पुणे, 4 नोव्हेंबर (हिं.स.)पुणे महापालिकेची निवडणूक अवघ्या दोन-तीन महिन्यांवर येऊन ठेपलेली असताना महापालिका प्रशासनाने मिळकतकराच्या थकबाकीदारांसाठी अभय योजना राबवून ‘बक्षीस’ देण्याची तयारी सुरू केली आहे.अभय योजना मंजूर करण्यासाठीचा प्रस्ताव महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे पाठविण्यात आला आहे.

प्रामाणिक करदात्यांना सवलत न देता दंडाची भिती दाखवली जाते, पण थकबाकीदारांचा दंड माफ करून महापालिकेचे कोट्यावधी रुपयांचे उत्पन्न बुडवले जात असल्याचे हे यातून समोर येत आहे.पुणे महापालिकेचे उत्पन्न वाढविण्याची सर्वाधिक जास्त जबाबदारी ही मिळकतकर विभागावर आहे. त्यामुळे थकबाकीदारांकडून रक्कम वसूल करण्यासाठी मिळकती जप्त करणे, टाळे ठोकणे, त्यांचा लिलाव करणे अशा उपाययोजना महापालिका राबवत असते

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande