पुणे महापालिकेतर्फे आता ‘खड्डेमुक्त पुणे अभियान’ ॲप
पुणे, 4 नोव्हेंबर (हिं.स.)शहरातील रस्त्यांना पडलेले खड्डे बुजविण्यासाठी महापालिकेने ॲप आणले, अभियंत्यांना कडक शब्दात आदेश दिले तरीही खड्डे कायम आहेत. त्यानंतर आता रस्त्यांवरील खड्डे शोधून ते बुजविण्यासाठी पथ विभागाने क्षेत्रीय कार्यालयांमधील अभियंत
PMC news


पुणे, 4 नोव्हेंबर (हिं.स.)शहरातील रस्त्यांना पडलेले खड्डे बुजविण्यासाठी महापालिकेने ॲप आणले, अभियंत्यांना कडक शब्दात आदेश दिले तरीही खड्डे कायम आहेत. त्यानंतर आता रस्त्यांवरील खड्डे शोधून ते बुजविण्यासाठी पथ विभागाने क्षेत्रीय कार्यालयांमधील अभियंत्यांची विशेष पथके तयार केले आहे.ही पथके आता प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून खड्ड्यांचा शोध घेऊन ते बुजविणार आहे. या ‘खड्डेमुक्त पुणे अभियानाचा’ प्रारंभ महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या हस्ते पार पडला.या वेळी अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, पथ विभाग प्रमुख अनिरुद्ध पावसकर आदी अधिकारी उपस्थित होते.गेल्या काही महिन्यांत पोलिसांच्या सीसीटीव्ही केबल टाकण्यासाठी शहरातील मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणावर खोदाई करण्यात आली होती. या कामांनंतर रस्त्यांचे व पदपथांचे पुनर्वसन न झाल्याने अनेक रस्ते अत्यंत खराब स्थितीत आले आहेत. धोकादायक खड्डे, उखडलेले पदपथ आणि वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या रस्त्यांमुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande