
पुणे, 4 नोव्हेंबर (हिं.स.)आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदार यादीतील दुबार मतदारांची नावे ओळखून त्यांच्या नावापुढे दुबार मतदार अशी नोंद करण्यात येणार आहे. तसेच दुबार मतदार मतदानासाठी आल्यास अन्य कोणत्याही मतदान केंद्रावर मतदान केले नसल्याचे हमीपत्र त्याच्याकडून घेण्यात येणार आहे. आगामी महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या काही दिवसांमध्ये होणार आहेत.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी विधानसभे निवडणुकीतील मतदार यादी वापरण्यात येणार आहे. मात्र, यामध्ये आढळणाऱ्या दुबार नावांच्या त्रुटी दूर करण्यासाठी विशेष कार्यप्रणाली निश्चित करण्याचे आदेश राज्य निवडणुक आयोगाने दिले आहेत. त्यानुसार जिल्हा निवडणूक शाखेकडूनही त्याबाबतचे नियोजन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु