
पुणे, 4 नोव्हेंबर (हिं.स.)। राज्याच्या महसुली विभागात (मुंबई वगळून ) साडेबारा हजार स्वंयसेवक (नागरिक, शासकीय कर्मचारी आणि अधिकारी यांच्यासह )यांच्या सहकार्याने 34 जिल्हे, 34 जिल्हा परिषदा, 352 पंचायत समिती आणि सुमारे 28 हजार ग्रामपंचायतीमध्ये जलसाक्षरता मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेनुसार राज्यातील नागरिकांना पाण्याचे महत्व पटवून देणे, पाण्याची बचत कशी करावी, पाण्याचा आधुनिक पध्दतीने वापर कसा करावा याबाबत ‘जलसाक्षरता मोहिम’ राबविण्यात येत असून, या मोहिमेसाठी पुण्यातील ‘यशदा’ ने पुढाकार घेतला आहे.
ही मोहिम सन 2027 सालापर्यत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. जलसाक्षरता मोहिमेच्या माध्यमातून प्रशिक्षण घेऊन तयार झालेले स्वयंसेवक अगदी राज्यपातळीपासून ग्रामपंचायत पातळीपर्यत जाऊन ते पाण्याचे नियोजन कसे करावे, पाण्याचा ताळेबंद आणि अंदाजपत्रक कसे तयार करावे याबाबत गावपातळीवर नागरिकांच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहे .त्यास यश येऊ लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु