
बीड, 4 नोव्हेंबर (हिं.स.)। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने गेवराई येथे तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक पार पडली. या बैठकीस प्रदेशाध्यक्ष मेहबूब भाई शेख, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते मोहनराव जगताप, युवक सचिव के.के.वडमारे, प्रवक्ते शिवराज बांगर,तालुका अध्यक्ष अण्णासाहेब राठोड, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते राजेंद्रजी मोटे, कुंदन काळे, यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. बैठकीत आगामी निवडणुकीसाठी पक्षाच्या संघटनात्मक तयारीचा आढावा घेण्यात आला तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) आणि महाविकास आघाडी या दोन्ही घटक पक्षांच्या समन्वयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भक्कम लढाई करण्याचा निर्धार करण्यात आला.जनतेच्या विश्वासाच्या बळावर विजय आपलाच असेल असे यावेळी सांगण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ सेल बीड महादेव मोहिते, अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष सय्यद अख्तर, शहराध्यक्ष गेवराई, शहराध्यक्ष गेवराई,परमेश्वर जाधव, अपंग सेल तालुकाअध्यक्ष विलास राठोड यांच्या सह आदी उपस्थित होते.
---------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis