
परभणी, 4 नोव्हेंबर, (हिं.स.)। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली. शिवसेनाचे युवा नेते तथा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मुंबई येथे एक महत्त्वपूर्ण रणनीती बैठक आयोजित केली होती. या बैठकीस पाथरी विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच परभणी जिल्ह्यातील शिवसेनेचे विविध जबाबदारी सांभाळणारे नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीदरम्यान डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आगामी निवडणुकीसाठी आवश्यक संघटनात्मक तयारी, जनसंपर्क मोहिमा, मतदारांशी सातत्यपूर्ण संवाद आणि कार्यकर्त्यांच्या एकजुटीचे महत्त्व यावर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, शिवसेना ही जनतेच्या मनात खोलवर रुजलेली विचारधारा आहे आणि प्रत्येक कार्यकर्त्याने त्या विचारधारेचा प्रसार करत, विकास आणि जनकल्याण यांचा ठोस आराखडा लोकांपर्यंत पोहोचवावा.
शिंदे साहेबांनी कार्यकर्त्यांना संघटन मजबूत ठेवा, मतदारांशी घट्ट नातं निर्माण करा आणि स्थानिक पातळीवरील समस्यांवर तोडगा देण्यासाठी सज्ज राहा असा संदेश दिला. त्यांनी सांगितले की, येणाऱ्या काळात शहर, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद, नगरपालिका अशा सर्व स्तरांवरील निवडणुकांमध्ये शिवसेना आणि महायुतीचा भगवा विजयाच्या शिखरावर फडकवणे हेच आपले ध्येय असले पाहिजे. कार्यकर्त्यांमध्ये या बैठकीमुळे नवीन नवचैतन्य आणि आत्मविश्वास निर्माण झाला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis