
सोलापूर, 4 नोव्हेंबर (हिं.स.)ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर यांनी स्थापन केलेल्या ६८ लिंगांच्या जिर्णोद्धारासाठी आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महत्त्वपूर्ण कामासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. 2024-25 मध्ये तब्बल 12 कोटींचा निधी दिल्यानंतर आता 2025-26 च्या चालू बजेटमध्ये 14 कोटींचा निधी आमदार देवेंद्र कोठे यांना दिल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देवेंद्र कोठेंवर विशेष मर्जी असल्याचे व पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भक्कम साथ लाभत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.विधानसभेच्या अधिवेशना दरम्यान सोलापूर विकासाचे मुद्दे मांडत असताना आमदार देवेंद्र कोठे यांनी ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या ६८ लिंगांचा परिसर विकसित करून पर्यटन विकासाला चालना देता येईल असा मुद्दा मांडला होता. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या आमदारांच्या बैठकीतही सुद्धा त्यांनी हा मुद्दा प्रभावीपणे मांडला.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सुध्दा कोठेंच्या मुद्द्यांवर सकारात्मकता दाखवत निधीसाठी पाठपुरावा केला. ६८ लिंगांचा परिसर विकसित करण्यासाठी ६ कोटी ८० लाख रुपयांच्या निधीची मागणी आ. कोठे यांनी केली होती. त्यांच्या अथक प्रयत्नांना यश आले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या टप्प्यात त्यांना दोन कोटींचा निधी देण्याचा अध्यादेश जारी केला आहे. याशिवाय शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील विकास कामांसाठी 2025-26 च्या अर्थसंकल्पातून विशेष निधी मंजूर झाला आहे. या आर्थिक वर्षात आमदार देवेंद्र कोठे यांना 14 कोटी रुपये निधी वितरणाचा महाराष्ट्र शासनाचा अध्यादेश निघाला असून 12 कोटींच्या या निधीतून मतदारसंघातील 45 प्रमुख रस्ते व अंतर्गत रस्त्यांची कामे प्रस्तावित आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड