
सोलापूर, 4 नोव्हेंबर, (हिं.स.)महानगरपालिकेच्या वतीने शहर हद्दीतील महानगरपालिकेच्या मालकीच्या थकबाकी पोटी विशेष वसुली मोहिमे अंतर्गत अंत्रोळिकर शॉपिंग सेंटर मधिल 94 लाखांच्या थकबाकी पोटी नऊ गाळे सील करण्यात आले.शहर व परिसरातील थकबाकी गाळेधारकांना वारंवार नोटीस बजावण्यात आली होती. आता या वसुलीसाठी महानगरपालिकेने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. मेजर शॉपिंग सेंटर, मिनी शॉपिंग सेंटर, भुई-भाडे (खुली जागा), अभ्यासिका समाजमंदिर, अधिकृत खोके इत्यादी संपत्तीवरील गाळेधारक व भाडेधारकांकडील थकबाकी वसुली मोहीम सुरू करण्यात आली आहे.
महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या आदेशाने उपायुक्त अशिष लोकरे यांनी ही मोहिम हाती घेतली आहे. यासाठी पाच विशेष पथकांची नियुक्ती केली आहे. मोहिमेच्या पहिल्या दिवशी शहरातील अंत्रोळिकर शॉपिंग सेंटर मधील 9 गाळे सील करण्यात आले आहेत. या गाळेधारकांकडे 64 लाख 45 हजार 300 रूपयांची थकबाकी असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड