
सोलापूर, 4 नोव्हेंबर (हिं.स.)। द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया’ (आयसीएआय) यांच्यातर्फे सनदी लेखापाल (सीए) अंतिम, इंटरमिजिएट आणि फाउंडेशन परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत सोलापूर जिल्ह्यातील १९ विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे.भारतभरातून सीए फायनलसाठी एक लाख १ हजार २८ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ११ हजार ४६६ विद्यार्थ्यांनी सीए पदवी मिळवली आहे.
सोलापूर सेंटरवरून १०८ विद्यार्थ्यांनी सीए फायनलची परीक्षा दिली. त्यापैकी तब्बल १९ विद्यार्थ्यांनी चार्टर्ड अकाउंटंट पदवी प्राप्त केली. चार्टर्ड अकाउंटंट ही पदवी मिळवणे हे प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचे यश असते. सोलापूर येथील सर्व नव्या सी.ए. झालेल्या विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या बळावर हे स्वप्न साकार केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड