सोलापूर - नागरिकांना घरी बसून देता येणार पोलिसांत तक्रार
सोलापूर, 4 नोव्हेंबर, (हिं.स.) - सोलापूर शहर पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांनी नागरिकांसाठी पोलिसांच्या वेबसाईटचे नुतनीकरण केले आहे. त्यावर इंग्रजी व मराठीतून माहिती उपलब्ध असणार आहे. त्यातील सिटीजन पोर्टल लिंकवरून नागरिकांना सोलापूरसह राज्यभरात कोठ
Cp


सोलापूर, 4 नोव्हेंबर, (हिं.स.) - सोलापूर शहर पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांनी नागरिकांसाठी पोलिसांच्या वेबसाईटचे नुतनीकरण केले आहे. त्यावर इंग्रजी व मराठीतून माहिती उपलब्ध असणार आहे. त्यातील सिटीजन पोर्टल लिंकवरून नागरिकांना सोलापूरसह राज्यभरात कोठेही ऑनलाइन तक्रार करता येणार आहे. तसेच संकेतस्थळावर शहर नियंत्रण कक्षाचे व्हॉट्‌सॲप नंबर व क्युआर कोड दिले असून त्यावरून नागरिकांना तक्रार किंवा सूचना करता येणार आहेत. त्याचे लोकार्पण पोलिस आयुक्तांच्या हस्ते करण्यात आले.

सोलापूर शहर पोलिसांच्या संकेतस्थळाचे नुतनीकरण सर्वसामान्य नागरिकांची सोय होईल, असे करण्यात आले आहे. त्यासाठी पोलिस आयुक्त एम. राज कुमार, उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील, विजय कबाडे, गौहर हसन, सहायक पोलिस आयुक्त राजन माने, ‘सायबर’चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीशैल गजा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. नुतनीकरणासाठी पोलिस उपनिरीक्षक प्रविण भोपळे, नागेश इंगळे, पोलिस अंमलदार रतिकांत राजमाने, इब्राहिम शेख यांच्यासह पॉवर टेक्नालॉजीचे पंकज चव्हाण व त्यांच्या टीमने परिश्रम घेतले आहे. आता हे संकेतस्थळ सर्वांसाठी खुले असणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande