
सोलापूर, 4 नोव्हेंबर, (हिं.स.)।विजापूर नाका पोलिसांच्या हद्दीत १५ दिवसांत दोन गुन्हे घडले. रात्रीच्या वेळी आयटी इंजिनिअरला अडवून लुटणे आणि एका ज्वेलर्स दुकानात दरोड्याचा प्रयत्न झाला. यापूर्वी वसंत विहार परिसरात अशीच घटना घडली होती. या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरात आता प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकाचवेळी तीन ठिकाणी अचानक नाकाबंदी लावण्याचा निर्णय झाला. त्यावेळी वाहतूक पोलिसही असणार आहेत.
सोलापूर शहरातील गुन्ह्यांच्या अनुषंगाने विशेषत: विजापूर नाका पोलिसांच्या हद्दीतील घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांनी अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. सोलापूर शहरात सलगर वस्ती, एमआयडीसी, सदर बझार, फौजदार चावडी, एमआयडीसी, जेलरोड व जोडभावी अशी सात पोलिस ठाणी आहेत. सध्या दररोज रात्रीच्या वेळी एकाच ठिकाणी नाकाबंदीची कार्यवाही होते. वाहतूक पोलिस व स्थानिक पोलिसांची नाकाबंदी वेगवेगळी होती. पण, आता दररोज प्रत्येक पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी त्यांच्या हद्दीत प्रमुख तीन ठिकाणी नाकाबंदी लावावी, असा निर्णय झाला.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड