
सोलापूर, 4 नोव्हेंबर, (हिं.स.)। सोलापूर शहर पोलिसांच्या बॉम्बशोधक व नाशक पथकात ‘रॉक्सी’ दाखल झाली आहे. ते बेल्जियम गेलोनाईज शेफर्ड आहे. अंदाजे ५० हजार रुपयास घेतलेली ती चार महिन्यांची मादी आहे. सहा महिन्यानंतर तिला पुण्यात बॉम्बशोधण्यासंदर्भातील सहा महिने प्रशिक्षण दिले जाणार आहे. सोलापूर शहर पोलिसांनी ते श्वान पुण्यातून आणले आहे. पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांनी सोमवारी (ता. ३) श्वानाचे ‘रॉक्सी’ असे नामकरण केले.
सोलापूर शहरातील दैनंदिन गर्दीची ठिकाणे, मर्मस्थळे, बेवारस बॅगा, वाहनांची तपासणी, व्हीव्हीआयपींचे दौरे, बंदोबस्त, नागपूर येथील हिवाळी अधिवेशन, पंढरपूर आषाढी वारीचा बंदोबस्त, तुळजापूर येथील नवरात्रोत्सवातील बंदोबस्त, भीमा- कोरेगाव बंदोबस्त, नंदुरबार, नांदेड यातील व्हीव्हीआयपी बंदोबस्त अशा ठिकाणी या श्वानाची पोलिसांना मोठी मदत होते. नऊ वर्षांपर्यंत ते श्वान पोलिस दलात सेवेसाठी असते.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड