आशिष शेलारांची तुळजाभवानीचे दर्शन घेऊन सातवाहनकालीन त्रिविक्रम मंदिराला भेट
धाराशिव, 4 नोव्हेंबर (हिं.स.)राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी धाराशिव दौऱ्यावर असताना आज तुळजापूर येथील कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. यावेळी राज्य पुरातत्त्व विभागाचे संचालक डॉ. तेजस गर्गे, अन्य शासकीय अधिकारी आणि माजी
सातवाहनकालीन त्रिविक्रम मंदिराला भेट


सातवाहनकालीन त्रिविक्रम मंदिराला भेट


धाराशिव, 4 नोव्हेंबर (हिं.स.)राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी धाराशिव दौऱ्यावर असताना आज तुळजापूर येथील कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. यावेळी राज्य पुरातत्त्व विभागाचे संचालक डॉ. तेजस गर्गे, अन्य शासकीय अधिकारी आणि माजी जिल्हा परिषद उपाध्यक्षा अर्चना पाटील उपस्थित होत्या.तसेच सातवाहनकालीन त्रिविक्रम मंदिराला भेट

धाराशिव दौऱ्यावर असताना तेर येथील सातवाहनकालीन त्रिविक्रम मंदिराला भेट दिली व या प्राचीन मंदिराची पाहणी केली. इ.स. दुसऱ्या शतकात बांधलेले हे मंदिर राज्यातील सर्वात जुने इष्टिका (विटांचे) मंदिर आहे. बौद्ध चैत्याच्या शैलीत उभारलेले हे मंदिर स्थापत्यकलेच्या दृष्टीने अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. अर्धवर्तुळाकार गर्भगृह, गजपृष्ठाकार छप्पर आणि चिखलात बसविलेल्या प्राचीन विटांची बांधणी आजही तत्कालीन कुशल कारागिरीची साक्ष देते.महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभागाच्या जतन व संवर्धन योजनेअंतर्गत मंदिराचे काम पूर्णत्वास जात आहे. या कामाची पाहणी केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande