
नाशिक, 4 नोव्हेंबर (हिं.स.)। मागील सात महिन्यापासून सुरू असलेल्या पावसाने जिल्ह्यातील नगदी पिक असलेल्या द्राक्ष पिकांची मातीमोल कडे वाटचाल सुरू असून आता शेतकरी आपल्या द्राक्षबागा वाचविण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे दिवस रात्र द्राक्षबागांवरती जिल्ह्यात शेतकरी कार्य करत असल्याचे दृश्य समोर येत आहे.
जिल्ह्याला अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाने झोडपल्याने नाशिक जिल्ह्यातील सुमारे एक ते दीड लाख हेक्टरवरील द्राक्ष बागा संकटात सापडल्या आहेत. गेल्या दोन महिन्यापासून जिल्हाभरात सातत्याने पाऊस पडत आहे. यामुळे अन्य पिकांसह द्राक्ष शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेतकरी हवालदिल झाला आहे.
नाशिक जिल्हा हा द्राक्षाची पंढरी समजला जातो. जिल्ह्यात सुमारे दीड ते पावणे दोन लाख हेक्टरवर द्राक्षाचे क्षेत्र आहेत. परंतु मे महिन्यापासून सुरु झालेला पाऊस आजपर्यंत सुरूच आहे. या पावसामुळे द्राक्ष शेतीचे अतोनात नुकसान झाल्याचे सामोर येत आहे. यंदा बागा छाटणीपासून, फ्लॉवरिंग आणि फळधारणा अशा तिन्ही टप्प्यात पाऊस सुरु राहिल्याने जिल्ह्यातील ५० टक्के द्राक्ष बागा फेल गेल्या असून उरल्या सुरल्या बागा या अवकाळीने संकटात सापडल्या आहेत. अशा परिस्थितीत शेतकरी बागा वाचवण्यासाठी अतोनात प्रयत्न करताना दिसत येत आहे. आतापर्यंत ७५ टक्के बागा या पूर्णतः प्रभावित झाल्या आहेत.
जिल्ह्यात प्रमुख्याने निफाड, नाशिक, दिंडोरी, तसेच कळवण, सटाणा, बागलाण तालुक्यात द्राक्षाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. सप्टेंबर महिन्यात द्राक्ष बागा छाटणीला सुरुवात केली जाते. परंतु अगदी काही प्रमाणातच बागांनी चांगला फुटवा धरला आहे. तसेच ऑक्टोबर महिन्यात छाटणी झालेल्या बागांपैकी ५० टक्केच बागा चांगल्या स्थितीत राहिल्या. मात्र या बागादेखील अवकाळीचा तडाख्यात सापडल्या असून फ्लॉवरिंग स्थितीतील द्राक्ष वेली कुजण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे द्राक्ष शेतीसह बेदाणा आणि इतर व्यवसायदेखील आता भोक्यात आले आहे.
१८१ हेक्टर प्रभावित
जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीने थैमान घातल्यानंतर त्यातही काही शेतकऱ्यांनी बागा वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु सप्टेंबर महिन्यात पुन्हा अवकाळी पावसाला सुरुवात झाली. मागील काही दिवसात झालेल्या पावसामुळे १८१ हेक्टरवरील द्राक्ष बागांचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV