
लातूर, 4 नोव्हेंबर (हिं.स.)। माजी आ. कव्हेकरांच्या उपस्थितीत लातूर महानगरपालिकेतील शेकडो सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा भाजपात प्रवेश कार्यक्रम संपन्न झाला. लातूर महानगरपालिकेतील शेकडो सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी भारतीय जनता पक्षाचे (भाजपा) नेते, तसेच किसान मोर्चा गुजरात व गोवा राज्याचे प्रभारी, माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर आणि भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.
देशात प्रथम क्रमांकावर असलेल्या भाजपात मोठ्या संख्येने झालेल्या या प्रवेशामुळे पक्षाची ताकद लातूर शहरात अधिक वाढली आहे.
मजगे नगर येथील कैलास निवास येथे हा प्रवेशाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी प्रातिनिधीक स्वरूपात महादेव बनसुडे आणि शंकर कांबळे यांचा पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी प्रवेश करणाऱ्या आणि उपस्थित असलेल्या प्रमुख सेवानिवृत्त कर्मचारी व कार्यकर्त्यांची नावे: बी.एन. राऊत, पठान जागीरखाँ, ईश्वर दत्तु कुमार, शशिकांत पत्की, बायस ठाकूर, शिवाजी बासेर, हबीब पठाण, शेख महम्मद जिंदालाल, यशोदाबाई आगवाने, सुभाष पंडीत यांच्यासह असंख्य सेवानिवृत्त कर्मचारी व कार्यकर्ते या प्रवेश सोहळ्यासाठी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis