बीड पोलिस दलामध्ये फेरबदल; चार निरीक्षकांचे ठाणे बदलले
बीड, 5 नोव्हेंबर (हिं.स.)। जिल्हा पोलिस दलात अचानक मोठे फेरबदल करण्यात आले असून, बीड शहरातील तर गेवराईच्या एका महत्त्वाच्या पोलिस ठाण्यांतील निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.या बदलीत गेवराई, शिवाजीनगर, बीड ग्रामीण आणि पेठबीड या चार ठाण्यांच
बीड पोलिस दलामध्ये फेरबदल; चार निरीक्षकांचे ठाणे बदलले


बीड, 5 नोव्हेंबर (हिं.स.)। जिल्हा पोलिस दलात अचानक मोठे फेरबदल करण्यात आले असून, बीड शहरातील तर गेवराईच्या एका महत्त्वाच्या पोलिस ठाण्यांतील निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.या बदलीत गेवराई, शिवाजीनगर, बीड ग्रामीण आणि पेठबीड या चार ठाण्यांचा समावेश आहे.

गेवराई पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रवीणकुमार बांगर यांना शिवाजीनगर पोलिस ठाण्याची जबाबदारी देण्यात आलीआहे, तर शिवाजीनगरचे पोलिस निरीक्षक किशोर पवार यांची गेवराई पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.बीड ग्रामीण ठाण्याचे पोलिस निरीक्षक मारुती खेडकर यांना पेठबीड ठाण्यात हलवण्यात आले असून, पेठबीड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक मुदिराज यांना बीड ग्रामीण ठाण्यात नेमण्यात आले आहे.

दरम्यान याप्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी सांगितले की, संबंधित ठाणेदारांनी स्वतःच्या विनंतीवरून बदलीसाठी अर्ज केल्यामुळेच या बदली करण्यात आल्या आहेत.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande