सोलापूर - होटगी रोडवर होणार 50 एकरात आयटी पार्क
सोलापूर, 5 नोव्हेंबर (हिं.स.)। होटगी रोडवरील जलसंपदा विभागाच्या 50 एक जागेत 50 कोटी रुपयांत आयटी पार्क होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तरुणांना जिल्ह्यातच रोजगार उपलब्ध होणार आहे.मुख्यमंत्री द
सोलापूर - होटगी रोडवर होणार 50 एकरात आयटी पार्क


सोलापूर, 5 नोव्हेंबर (हिं.स.)। होटगी रोडवरील जलसंपदा विभागाच्या 50 एक जागेत 50 कोटी रुपयांत आयटी पार्क होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तरुणांना जिल्ह्यातच रोजगार उपलब्ध होणार आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या सूचनेनुसार सोलापुरातील आयटी पार्कसाठी जागा पाहणी काही दिवसांपूर्वीच करण्यात आली. यात अनेक ठिकाणच्या जागाही पाहण्यात आल्या. मात्र, होटगी येथील जलसंपदा विभागाच्या 50 एकर जागेत केवळ 50 कोटींच्या निधीतून आयटी पार्क उभारणे शक्य होणार असल्याने येथील जागेस पसंती देण्यात येत आहे.

आयटी पार्कसाठी जुनी मिल परिसराची जागा पाहणी करण्यात आली होती. मात्र ही जागा अपुरी असल्याचा अंदाज आयटी पार्कमधील तज्ज्ञांनी व्यक्त केला. हिरज येथील जागेचीही यासाठी पाहणी करण्यात आली. ही जागा योग्य होती, मात्र सदर जागा माळढोक क्षेत्रात येत असल्याने ही जागा अडचणीची ठरली आहे. त्यामुळे आयटी पार्कसाठी आयटी पार्कक्षेत्रातील मान्यवरांनी होटगी रोडवरील जागेस पसंती दिली आहे. मात्र ही जागाही अजून निश्चित करण्यात आली नसल्याचेही जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande