
प्रवेशद्वारास “राजमाता जिजाऊ प्रवेशद्वार” नामकरण करण्याची मागणी
छत्रपती संभाजीनगर, 5 नोव्हेंबर (हिं.स.)।
सिल्लोड येथे प.पू .सर्वानंद सरस्वती महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरू असलेल्या आमरण उपोषण आंदोलनास भाजपा आमदार तथा पंचायत राज समिती अध्यक्ष संतोष दानवे यांनी भेट देऊन चर्चा केली. व त्यांच्या हस्ते उपोषण सोडणविण्यात आले.
सिल्लोड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याकडे जाणाऱ्या प्रमुख प्रवेशद्वारावर सध्या ‘जामा मस्जिद’ असे नाव देण्यात आलेले आहे. हिंदवी स्वराज्याचे जनक छत्रपती शिवाजी महाराज आणि मातृशक्तीचा सर्वोच्च आदर्श असलेल्या राजमाता जिजाऊ यांच्या स्मृतीचा सन्मान राखण्यासाठी या प्रवेशद्वारास “राजमाता जिजाऊ प्रवेशद्वार” असे नामकरण करण्यात यावे व शहरातील इतर प्रमुख प्रवेशद्वारांना ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाला साजेशी नावे देण्यात यावी आणि ‘जामा मस्जिद’ परिसरातील चिल्ड्रन्स पार्कमधील अनधिकृत बांधकाम तातडीने हटवण्यात यावे, या मागण्यांसाठी प.पु सर्वानंद सरस्वती महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरू असलेल्या आमरण उपोषण आंदोलनास भाजपा आमदार तथा पंचायत राज समिती अध्यक्ष .संतोष दानवे यांनी भेट देऊन चर्चा केली. व त्यांच्या हस्ते उपोषण सोडणविण्यात आले.
हिंदू संस्कृतीच्या सन्मानासाठी प.पु सर्वानंद सरस्वती महाराज यांच्या नेतृत्वाखालील हे आंदोलन केवळ नामकरणापुरते नसून आपला धर्म, इतिहास आणि अस्मितेच्या संरक्षणाचा निर्धार आहे. याप्रसंगी संत, महंत, शिवभक्त हिंदू बांधव आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis