सासूच्या निधनापाठोपाठ सुनेलाही हृदयविकाराचा झटका
छत्रपती संभाजीनगर, 5 नोव्हेंबर (हिं.स.)। सासूच्या निधनाचे वृत्त समजताच सुनेलाही हृदयविकाराचा झटका आला आणि अर्धा तासाच्या आत दोघींचाही मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना छत्रपती संभाजीनगर येथे घडली आहे. छत्रपती संभाजी नगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
अ


छत्रपती संभाजीनगर, 5 नोव्हेंबर (हिं.स.)।

सासूच्या निधनाचे वृत्त समजताच सुनेलाही हृदयविकाराचा झटका आला आणि अर्धा तासाच्या आत दोघींचाही मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना छत्रपती संभाजीनगर येथे घडली आहे.

छत्रपती संभाजी नगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी सुरक्षा अधिकारी सुरेश परदेशी यांना दुहेरी शोक झाला आहे.

रुक्मिणी बाई रूपचंद परदेशी आणि विजया परदेशी अशी त्यांची नावे आहेत.

छत्रपती संभाजीनगरच्या वेदांतनगर भागातील घटना आहे

शंभरीच्या उंबरठ्यावर असलेल्या सासूच्या निधनाचे वृत्त समजताच सुनेचाही हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना येथील वेदांतनगर भागात घडली. मयत दोघी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी सुरक्षा अधिकारी सुरेश परदेशी यांच्या पत्नी व आई आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande