सोलापुरातून डिसेंबरमध्ये गोव्यालाही दररोज विमानसेवा
सोलापूर, 5 नोव्हेंबर (हिं.स.)। सोलापूर विमानतळावरून आता गोवा आणि मुंबईसाठी विमानसेवा सुरू झाली आहे. विमानतळ सुरू झाल्याने मंत्र्यांचे दौरे वाढले आहेत. दररोज विमाने ये-जा करतात. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी विमानतळावर पोलिसांचे पुरेसे मनुष्यबळ कायमचे ला
Air Plane


सोलापूर, 5 नोव्हेंबर (हिं.स.)। सोलापूर विमानतळावरून आता गोवा आणि मुंबईसाठी विमानसेवा सुरू झाली आहे. विमानतळ सुरू झाल्याने मंत्र्यांचे दौरे वाढले आहेत. दररोज विमाने ये-जा करतात. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी विमानतळावर पोलिसांचे पुरेसे मनुष्यबळ कायमचे लागणार आहे. त्याअनुषंगाने, अतिरिक्त ७० पोलिस अंमलदार द्यावेत आणि विमानतळ परिसरात नव्या पोलिस ठाण्यासही परवानगी शहर पोलिसांनी मागितली आहे. तसा प्रस्ताव देऊनही अद्याप गृह विभागाकडून कोणताही निर्णय झालेला नाही.

शुक्रवारपासून सोलापूर विमानतळावरून आता सोलापूर ते मुंबई विमानसेवा नियमित सुरू होईल. डिसेंबरमध्ये गोव्यालाही सोलापुरातून दररोज विमानसेवा सुरू होणार आहे. सोलापूरच्या विमानतळावर ६७ व ७२ सीटर दोन विमाने एकाचवेळी उतरू शकतात. याशिवाय दोन हेलिकॉप्टर किंवा दोन चार्टर्ड विमानेही (१२ ते १५ सीटर) एकाचवेळी विमानतळावर उतरू शकतात.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande