
बीड, 5 नोव्हेंबर (हिं.स.)। कार्तिक पौर्णिमेला संतशिरोमणी श्री मन्मथस्वामींच्या श्रीक्षेत्र कपिलधार येथील यात्रेला सुरुवात झाली असून, गुरुवारी समारोप होणार आहे. यावर्षी बीड मार्गावरून जाणाऱ्या भाविकांना कपिलधार वाडीचा रस्ता बंद असल्याने ४ किमीचा वळसा घेत कपिलधार घाटातून जावे लागणार आहे.यावर्षी वाहने बंद करण्यात आल्याने ३ किमी पायी भाविकांना दर्शनासाठी जावे लागणार आहे. या दरम्यान संस्थानकडून भाविकांसाठी नियोजन करण्यात आले आहे. दरम्यान, जवळपास २० दिंड्या दाखल झाल्या आहेत.
गतवर्षी जवळपास लाखभर भाविक आले होते. यात यंदा वाढ होणार असून, दीड ते लाख भाविक येण्याचा अंदाज आहे.्श्रीक्षेत्र कपिलधार येथे आयोजित यात्रोत्सवास सुरुवात झाली असून, राज्यभरातून भाविकांच्या दिंड्यांचा ओघ सुरू आहे. यात्रेत सहभागी होणाऱ्या भाविकांसाठी पहाटे ३ वाजल्यापासून मंदिर दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले आहे. यात्रोत्सवाचा मुख्य सोहळा बुधवारी दुपारी चार वाजता जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, शिवाचार्य तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत संतशिरोमणी मन्मथस्वामींच्या समाधीची महापूजा केली जाईल.बंदोबस्तासाठी देवस्थानकडून १५० स्वयंसेवक, 30 महिला व पुरुष होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत.
मांजरसुंबा मार्गे रस्ता : यंदा कपिलधारवाडी रस्ता बंद असल्याने भाविक मांजरसुंबा मार्गे कपिलधारला दाखल होत आहेत. यामुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने घाटमाथ्यावर वाहन पार्किंगची सोय करण्यात आली आहे.
देवस्थानकडून १५० स्वयंसेवक, ३० महिला व पुरुष होमगार्ड, विडूळ (जि. नांदेड) येथील ८० स्वयंसेवक तैनात करण्यात आले आहे.
यात्रा काळात पहाटे ३ ते रात्री बारा वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी खुले राहणार आहे.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis