बीडच्या केजमधील ९५ टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावर ७१ कोटींचे अनुदान जमा
बीड, 5 नोव्हेंबर (हिं.स.)केज तालुक्यात ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या नुकसानीपोटी शासनाने तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांसाठी मंजूर केलेल्या अनुदा
बीडच्या केजमधील ९५ टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावर ७१ कोटींचे अनुदान जमा


बीड, 5 नोव्हेंबर (हिं.स.)केज तालुक्यात ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या नुकसानीपोटी शासनाने तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांसाठी मंजूर केलेल्या अनुदानाची ७९ कोटी ६ लाख १८ हजार ६१९ रुपयांची रक्कम १५ टक्के शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली आहे. आता ५ टक्के म्हणजे पाच हजार शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत.

केज तालुक्यात खरीप हंगामात ९३ हजार ३४७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. त्यात सर्वाधिक क्षेत्र हे सोयाबीन पिकाचे होते. सोयाबीन शेंगा भरण्याच्या अवस्थेत असताना ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी झाली. त्याचा चांगलाच फटका सोयाबीनला बसला. तर काढणीच्या सप्टेंबर महिन्यात पुन्हा अतिवृष्टीने सतत पाऊस पडत राहिल्याने नदी, नाल्यांना आलेल्या पुरात नदी काठच्या जमिनी पिकांसह वाहून गेल्या होत्या.

ज्या शेतकऱ्यांच्या नावे सामायिक जमीन आहे, जे शेतकरी मयत झाले असून जे शेतकरी बाहेरगावी स्थलांतरित आहेत. असे शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले आहेत. या शेतकऱ्यांना अनुदान मिळण्यासाठी संबंधित सज्जाच्या तलाठ्यामार्फत त्यांची आवश्यक माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. अशी माहिती तहसील कार्यालयाच्या संबंधित विभागातून देण्यात आली आहे.

ज्या शेतकऱ्यांचे अतिवृष्टीचे अनुदान त्यांच्या बँक खात्यावर जमा झाले नाही. अशा खातेदारा शेतकऱ्यांना अनुदान मिळावे यासाठी प्रशासनामार्फत कार्यवाही केली जात आहे. ज्यांच्या त्रुटी आहेत त्यांच्या कागदपत्रांची पुर्तता केली जात असुन बाहेरगावी असलेल्या खातेदारांनाही कळवण्यात आले आहे. येत्या काही दिवसातच उर्वरीत शेतकऱ्यांच्याही खात्यावर रक्कम जमा होईल

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande