
बीड, 5 नोव्हेंबर (हिं.स.)माजलगाव तालुक्यातील लुखेगाव येथील सिंधफणा नदीकाठावरील शेतजमिनी खरडून गेल्यानंतरही शेतकऱ्यांचे पंचनामे झालेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी १२ नोव्हेंबर रोजी लुखेगाव येथे नदीत जलसमाधी करण्याचा इशारा दिला आहे.
काही अधिकाऱ्यांनी चिरीमिरी घेऊन खोटे पंचनामे केले. त्यामुळे संबंधित तलाठी, कृषी सहायक, ग्रामसेवक यांच्यावर सखोल चौकशी करून कठोर कारवाई करावी, गुन्हे दाखल करावेत. वंचित शेतकऱ्यांचे सात दिवसात पंचनामे करून त्यांना न्याय द्यावा, अन्यथा आंदोलन अटळ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.या आंदोलनात राशेद खान नेमत खा पठाण, रघुनाथ किसन पवार, बापूराव रघुनाथ पवार आदी सहभागी होणार आहेत.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis