
पुणे, 5 नोव्हेंबर (हिं.स.)। भारताच्या जागतिक सागरी केंद्राच्या उदयाचे प्रतिबिंब असलेल्या सागरी वाहतुकीत गेल्या दशकभरात सुमारे ७० टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र, वातावरणीय बदल, हवामानातील अस्थिरता यामुळे समुद्री किनारपट्ट्या, बंदरे यांच्या दीर्घकालीन सुरक्षितेबाबत नवीन आव्हाने निर्माण झाली आहेत,’ अशी माहिती केंद्रीय जल आणि उर्जा संशोधन केंद्राचे (‘सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन -सीडब्लू अँड पीआरएस) संचालक डाॅ. प्रभात चंद्रा यांनी दिली.
‘सीडब्ल्यूपीआरएस’ आणि भारतीय हायड्रोलिक्स सोसायटी (आयएसएच) यांच्या वतीने ‘किनारपट्टी, बंदर आणि सागरी अभियांत्रिकी’ या विषयावर ६ आणि ७ नोव्हेंबर असे दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परिषद खडकवासला येथील ‘सीडब्ल्यूपीआरएस’च्या आवारात होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु