पुण्यात आता स्वच्छतागृहही ‘स्मार्ट’
पुणे, 5 नोव्हेंबर (हिं.स.)। सार्वजनिक स्वच्छतागृहाची ओळख बदलू शकते अशा पुण्यातील पहिल्या वातानुकूलित स्वच्छतागृहाचे लोकार्पण आज विमाननगर येथे करण्यात आले. फिनिक्स मॉल शेजारील जागेत पुणे महानगरपालिकेने हे ‘स्मार्ट पब्लिक टॉयलेट’ बनवले आहे.वडगाव शेरी
पुण्यात आता स्वच्छतागृहही ‘स्मार्ट’


पुणे, 5 नोव्हेंबर (हिं.स.)। सार्वजनिक स्वच्छतागृहाची ओळख बदलू शकते अशा पुण्यातील पहिल्या वातानुकूलित स्वच्छतागृहाचे लोकार्पण आज विमाननगर येथे करण्यात आले. फिनिक्स मॉल शेजारील जागेत पुणे महानगरपालिकेने हे ‘स्मार्ट पब्लिक टॉयलेट’ बनवले आहे.वडगाव शेरी चे आमदार बापूसाहेब पठारे आणि पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त परमित कौर यांच्या हस्ते स्वच्छतागृहाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी महानगरपालिकेचे घनकचरा विभाग प्रमुख संदीप कदम, सहाय्यक आयुक्त कैलास केंद्रे, कार्यकारी अभियंता अमर मतीकुंड, उप अभियंता अजित नाईकनवरे, कनिष्ठ अभियंता परशुराम चोपडे, विभागीय आरोग्य अधिकारी धनश्री जगदाळे, स्वच्छतागृहासाठी पाठपुरावा करणारे स्थानिक रहिवासी फुलचंद म्हस्के उपस्थित होते.

उपायुक्त कदम म्हणाले, हे स्वच्छतागृह लोखंडी सांगाड्यात ( प्री फॅब्रिकेटेड) उभारण्यात आले आहे. या स्वच्छतागृहा शेजारी एक अल्पोपहार केंद्र सुद्धा आहे. या दुकानातून मिळणाऱ्या उत्पन्नातून येथील कर्मचाऱ्यांचा पगार आणि देखभाल खर्च सदर स्वच्छतागृह चालवणारी कंपनी करेल. त्यामुळे स्वच्छतागृह चालवण्यासाठी पुणे महानगरपालिकेला कोणताही खर्च येणार नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande