टीईटी निर्णयाविरोधात ९ नोव्हेंबरला मूक मोर्चा, पुनर्विलोकन याचिका दाखल करण्याची मागणी
अमरावती, 5 नोव्हेंबर (हिं.स.) शिक्षक पात्रता परीक्षा टीईटीसंदर्भात शिक्षकांना संरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिका दाखल करावी, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेने ९ नोव्हेंबरला
टीईटी निर्णयाविरोधात ९ नोव्हेंबरला मूक मोर्चा, पुनर्विलोकन याचिका दाखल करण्याची मागणी


अमरावती, 5 नोव्हेंबर (हिं.स.)

शिक्षक पात्रता परीक्षा टीईटीसंदर्भात शिक्षकांना संरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिका दाखल करावी, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेने ९ नोव्हेंबरला रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर शिक्षकांचा मूकमोर्चा काढण्याचे निश्चित केले आहे.

शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठीमहाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेने या मूक मोर्चाचे आयोजन केले आहे. राज्यातील सर्व शिक्षकांनी मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होऊन मोर्चा यशस्वी करावा, असे आवाहन मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस राजेश सुर्वे यांनी केले आहे. अमरावती येथे ९ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता ईर्विन चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन अमरावती जिल्हा समन्वय शिक्षक समितीने केले आहे.

प्रमुख मागण्या

टीईटी परीक्षा रद्द करा, या प्रमुख मागणीसह शिक्षण सेवक पद्ध पद्धत रद्द करण्यात यावी, १५ मार्च २०२४चा संच मान्यता शासन आदेश रद्द करण्यात यावा. जुनी पेन्शन योजना लागू करा. सर्व ऑनलाइन कामे रद्द करा, राज्यातील सर्व विषय शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी लागू करण्यात यावी. वस्तीशाळा शिक्षकांची मूळ सेवा ही सेवासातत्यासाठी गृहीत धरण्यात यावी.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande