
सोलापूर, 5 नोव्हेंबर (हिं.स.)। राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. त्यात सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, पंढरपूर, कुर्डुवाडी, करमाळा, सांगोला, मंगळवेढा, मैंदर्गी, दुधनी, मोहोळ व अकलूज या नगरपरिषदांचा समावेश आहे. तर अनगर या एकमेव नगरपंचायतीसाठी पहिल्यांदाच मतदान होणार आहे. नगरपरिषदांमधील २७२ सदस्य तर एकमेव अनगर नगरपंचायतीत १७ नगरसेवक असणार आहेत. निवडणुकीस इच्छुक उमेदवारांना १० ते १७ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील नगरपरिषदा व नगरपंचायतीसाठी चार लाख ४३ हजार ६०५ मतदार आहेत. त्यात ११ हजार ५१४ दुबार मतदार आहेत. त्या प्रत्येकाच्या घरी नगरपरिषदांचे अधिकारी- कर्मचारी जाणार आहेत. त्यांना नेमके कोणत्या प्रभागात किंवा नगरपरिषदेसाठी मतदान करायचे आहे, हे त्यांच्याकडून लिखित घेतले जाणार आहे. एका मतदारास त्यांच्या द्विसदस्यीय प्रभागातील दोन उमेदवारांना प्रत्येक मत द्यायचे आहे. तर यंदा नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडला जाणार असल्याने त्या उमेदवारालाही मतदारास तिसरे मत द्यावे लागणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड