
लातूर, 5 नोव्हेंबर (हिं.स.)
वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी लातूर पोलिसांनी ऑटो चालकावर दंडात्मक कारवाई मोठ्या प्रमाणात सुरू केली आहे १८९ अॅटोचालकावर केसेस करून १लाख ६४ हजार ५०० रुपये दंड आकारण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
लातूर शहरातील वाहनांना शिस्त लावण्यासाठी वाहन पार्कीग करणारे वाहनावर, मोठे आवाज करणारे बुलेटला सायलेन्सर बसवणे व अॅटोरिक्षाचालकाविरूध्द ई-चलान मशिनव्दारे दंडात्मक कारवाई केलेले दंडाची पूर्ण १०० टक्के रक्कम भरून घेणेबाबत विशेष मोहिम वाहतूक पोलीसांकडून राबविली जात असून या मोहीमे अंर्तगत बेशिस्त वाहनधारकावर कारवाईचा बडगा उगारला जात आहे.
अॅटोरिक्षा यांच्या मागील ई-चलान मशिनव्दारे दंडात्मक कारवाई केलेला पुर्वाचा दंड वसूल करण्याबाबत विशेष मोहीम राबवण्यात आली, तसेच टेप साऊड, ब्लॅक फिल्म, वाहन चालवताना मोबाईल फोनवर बोलणा-याविरुध्द सोबत विना लायसन वाहन चालविणे/विना लासयन्स वाहन चालविण्यास देणे, टिबल सीट, कर्कष्य हार्न वाजविणारे चालक, मोठे आवाज करणारे सायलन्सर बविणे, वाहतूक चिन्हाचा भंग करणारे, नंबर प्लेट नसणे/हेल्मेट नसणे, मोटार सायकल चे कागदपत्र सोवत न बाळगणारे, ईतर सदरा खालील प्रकरणास मोटार वाहनाखाली तसेच अॅटो चालक हा गणवेष परिधान करणा-या अॅटोरिक्षा चालकांवरही कडक कार्यवाही चालू असून १८९ अॅटोचालकावर केसेस करून १लाख ६४ हजार ५०० रुपये दंड आकारण्यात आला आहे.
तर इंटर सेप्टर वाहनाव्दारे ओव्हर स्पीड केसेस ५६ केसेस करून १ लाख १२ हजार रूपये करण्यात आले. तसेच ज्या अॅटोचे अनपेड ई-चलान भरणे थकीत असलेले केसेसचा दंड (सेंन्ड टू कोर्ट करून) न्यायालयात त्यांचे विरूध्द खटले दाखल करण्यात येत आहेत.
मुख्य चौकामध्ये ५० ते ७५ मिटर अंतराचे आत धांवणारे वर व कोठेही थांबून बेशिस्तपणे प्रवासी चढ-उतार करणारेवर वाहनावर भारतीय न्याय संहीता कलम २८५ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis