बिबट्यांच्या नसबंदीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवणार - जिल्हाधिकारी डुडी
पुणे, 5 नोव्हेंबर (हिं.स.)। गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्यामुळे त्रस्त असलेल्या पिंपरखेड, जांबूत परिसरास जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी प्रत्यक्ष भेट द्यावी, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी डुडी यांनी पिंपरखेड य
बिबट्यांच्या नसबंदीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवणार  - जिल्हाधिकारी डुडी


पुणे, 5 नोव्हेंबर (हिं.स.)। गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्यामुळे त्रस्त असलेल्या पिंपरखेड, जांबूत परिसरास जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी प्रत्यक्ष भेट द्यावी, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी डुडी यांनी पिंपरखेड येथे भेट देऊन बोंबे कुटुंबीय आणि ग्रामस्थांशी संवाद साधला. बिबट्यांच्या नसबंदीचा प्रस्ताव राज्य सरकारडून केंद्राकडे पाठवण्यात येणार असल्याचे डुडी यांनी सांगितले.या वेळी पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, प्रांताधिकारी पूनम अहिरे, तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, पोलीस उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले, सहायक वनसंरक्षण अधिकारी स्मिता राजहंस, देवदत्त निकम आदी उपस्थित होते.

पिंपरखेड येथे रविवारी बिबट्याने केलेले हल्ल्यामध्ये रोहन विलास बोंबे हा १३ वर्षांचा शाळकरी मुलगा मृत्युमुखी पडला. तसेच, शिवन्या बोंबे, भागुबाई जाधव हेदेखील बिबट्याच्या हल्ल्यात मरण पावले. बिबट्यांचा प्रश्न शासनाने कायमस्वरूपी मार्गी लावावा, यासाठी ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलनासह रोहनच्या मृतदेहाचे शवविच्छेदनास विरोध केला होता. या पार्शवभूमीवर जिल्हाधिकारी डुडी यांनी पिंपरखेड येथे भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande