पुणे विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाइन अध्ययन प्रशाळेमार्फत मुक्त शिक्षणाची सुविधा उपलब्ध
पुणे, 5 नोव्हेंबर (हिं.स.)। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाइन अध्ययन प्रशाळेमार्फत सुरू करण्यात आलेल्या ऑनलाइन अभ्यासक्रमांना मोठा प्रतिसाद लाभला आहे. दूरस्थ अभ्यासक्रमांच्या तुलनेत ऑनलाइन अभ्यासक्रमांकडे कल असल्याचे दिसून येत
पुणे विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाइन अध्ययन प्रशाळेमार्फत मुक्त शिक्षणाची सुविधा उपलब्ध


पुणे, 5 नोव्हेंबर (हिं.स.)। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाइन अध्ययन प्रशाळेमार्फत सुरू करण्यात आलेल्या ऑनलाइन अभ्यासक्रमांना मोठा प्रतिसाद लाभला आहे. दूरस्थ अभ्यासक्रमांच्या तुलनेत ऑनलाइन अभ्यासक्रमांकडे कल असल्याचे दिसून येत असून, त्यात प्रामुख्याने ऑनलाइन एमबीए, एमसीए अभ्यासक्रमांचा समावेश आहे.विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाइन अध्ययन प्रशाळेमार्फत मुक्त शिक्षणाची सुविधा उपलब्ध दिली जाते. त्या माध्यमातून महिला, नोकरदार यांना पदवी, पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करण्याची संधी मिळते. दूरस्थ पद्धतीने कला, वाणिज्य पदवी, कला, वाणिज्य पदव्युत्तर पदवी, एमबीए, तसेच ऑनलाइन पद्धतीने एमबीए, एमसीए या अभ्यासक्रमांसाठी प्रवेशप्रक्रिया राबवण्यात आली होती. त्यासाठी १५ ऑक्टोबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. ऑनलाइन, दूरस्थ अभ्यासक्रमांनाही नियमित शिक्षणाची समकक्षता दिली आहे. त्याचा सकारात्मक परिणाम प्रवेशांवर झाल्याचे दिसून येत आहे. २०२४-२५मध्ये एकूण ३ हजार ५८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता, तर यंदा २ हजार ६७६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. त्यात ऑनलाइन अभ्यासक्रमांच्या प्रवेशांकडे असलेला कल अधोरेखित होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande