
लातूर, 6 नोव्हेंबर, (हिं.स.)। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने लातूर जिल्हा निवडणूक प्रभारी म्हणून आ.श्री. संभाजी भैय्या पाटील निलंगेकर यांची निवड करण्यात आली आहे.
तसेच ग्रामीण जिल्हा निवडणूक प्रमुख म्हणून आ.श्री. अभिमन्यू भैय्या पवार आणि शहर जिल्हा निवडणूक प्रमुख म्हणून डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाने मोर्चेबांधणी सुरू केली असून आगामी निवडणुकीमध्ये यश मिळवण्याच्या दृष्टीने मोर्चे बांधणी सुरू केली आहे
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis