
अकोला, 6 नोव्हेंबर (हिं.स.)।
वंचित बहुजन युवा आघाडी जिल्हा व महानगर ने सोशल मीडिया ट्रोलर्सला अटक
करण्याच्या मागणीसाठी
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर
धरणे आंदोलन केले.
वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड प्रकाश आंबेडकर आणि युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या वर काही मनुवादी ट्रोलर्स हे ट्रॉल करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या ट्रोलर्स वर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी वंचीत बहुजन आघाडी करण्यात आली होती.. याप्रकरणी गुन्हे दाखल करून घेण्यात आले मात्र आज पर्यंत पोलीस प्रशासनाने काहीच कारवाई केली नाही. त्याला विरोध आणि ट्रोलर्सला अटक करण्याची मागणी साठी वंचित बहुजन युवा आघाडी आक्रमक होऊन जिल्हाधिकारी कार्याल्यासमोर धरणे देण्यासाठी शेकडोच्या संख्येने धरणे आंदोलन करण्यात आले. सलग पाच तास जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील तिन्ही रस्ते बंद करावे लागले होते.
यावेळी युवा आघाडी पदाधिकारी ह्यांनी प्रशासनाला जाहीर ठणकावून सांगितले कि, तुम्ही ट्रोलर्सला अटक करत नसाल तर आम्ही त्यांना आमच्या स्टाईल ने ठोकून काढू जिल्ह्यात निवडणूक प्रकिया सुरू असून निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांनी ट्रोलर्स अटक करावे, अन्यथा पुढील आंदोलन अघोषित असेल असा निर्वाणीचा इशारा देखील देण्यात आला.
यावेळी युवा आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्रभाऊ पातोडे, जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे, जिल्हा महासचिव राजकुमार दामोदर, महानगर अध्यक्ष वैभव खडसे, वंचितचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष आम्रपालीताई खंडारे, भारिप चे जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे, महासचिव मिलिंद इंगळे
आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे