सरदार पटेल जयंतीनिमित्त अकोला जिल्ह्यात एकता पदयात्रांचे आयोजन
अकोला, 6 नोव्हेंबर (हिं.स.)। भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त ‘सरदार@१५०’ उपक्रम राबविण्यात येत असून, जिल्ह्यात दोन ठिकाणी एकता पदयात्रांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात जिल्हास्तरीय युनिटी मार्च दि. ११ न
सरदार पटेल जयंतीनिमित्त अकोला जिल्ह्यात एकता पदयात्रांचे आयोजन


अकोला, 6 नोव्हेंबर (हिं.स.)।

भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त ‘सरदार@१५०’ उपक्रम राबविण्यात येत असून, जिल्ह्यात दोन ठिकाणी एकता पदयात्रांचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्ह्यात जिल्हास्तरीय युनिटी मार्च दि. ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० वा. अकोला येथे, तसेच दि. १२ नोव्हेंबर रोजी स. ८.३० वा. मूर्तिजापूर येथे काढण्यात येईल. सर्व नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी केले आहे.

उपक्रमात पदयात्रांबरोबरच रक्तदान शिबिर, व्यसनमुक्ती मार्गदर्शन, निबंध स्पर्धा, पथनाट्य, वादविवाद स्पर्धा, स्वच्छता मोहिम, आरोग्य शिबिरे आदी विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. अकोला येथे दि. ११ नोव्हेंबर रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत वसंत देसाई क्रीडांगणापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य पदयात्रेचे आयोजन केले जाईल. पदयात्रेदरम्यान आत्मनिर्भर भारताची प्रतिज्ञा, सांस्कृतिक कार्यक्रम व प्रदर्शनांचे आयोजनही करण्यात येणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande