
नाशिक, 6 नोव्हेंबर, (हिं.स.)। महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रिकल्चर व इंडो रोड सेफ्टी फाऊंडेशन तर्फे आयोजित नाशिक शहर वाहतूक समस्या निराकरण या विषयावर आयोजित चर्चासत्रात पोलीस उपायुक्त कृतिका सिंह यांनी मार्गदर्शन करताना शहरातील व्यापार्यांना मुख्यत्वे महत्त्वाच्या बाजारपेठेत सण, उत्सव दरम्यान जाणवणार्या समस्यांविषयी माहिती जाणून घेतली.
शहरातील सीबीएस, शालिमार, रविवार कारंजा, पंचवटी, द्वारका, नाशिकरोड रेल्वे स्टेशन, बिटको चौक, मुंबईनाका, पाथर्डी फाटा येथे वाहतूक कोंडीचा सामना नाशिककरांना करावा लागतो. याविषयी रिक्षा संघटनांना विश्वासात घेऊन वाहतूक नियमांचे पालन करणसाठी रिक्षा चालकांना समज दिली असून रिक्षांवर दंडात्मक कारवाई केल्याची माहिती वाहतूक विभागातर्फे देण्यात आली.
महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष संजय सोनवणे यांनी महाराष्ट्र चेंबर हे कायम व्यापार व उद्योगांंच्या समस्या सोडविण्यासाठी तत्पर असून शहरातील वाहतूक समस्या व निराकरण यासारख्या चर्चासत्रद्वारे प्रयत्न करत राहील, असे सांगितले. स्वागत वासुदेव भगत तर आभार को-चेअरमन भावेश मानेक यांनी मानले.
चर्चासत्र कार्यकारीणी सदस्य सचिन शहा, दत्ता भालेराव, डॉ. सोनल दगडे, संदिप सोमवंशी, राजाराम सांगळे, मंदार वाईकर, बाळासाहेब आमरे, टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रकाश विसपुते, नाशिक सराफ अससोसिएशनचे अध्यक्ष गिरीश नवसे, रिटेल क्लॉथ मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष नरेश पारख, हार्डवेअर अॅण्ड पेन्ट्स मर्चंट्स असोसिएशनचे उपाध्यक्ष मुस्तानगीर मोगरावाला, नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशन अध्यक्ष पी. एम. सैनी, बस असोसिएशनचे दिलीपसिंग बेनीवाल यांच्यासह व्यापारी, औद्योगिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV