सत्तेची फळे चाखण्यासाठीच भाजपमध्ये इनकमिंग : आ. सुभाष देशमुख
सोलापूर, 6 नोव्हेंबर (हिं.स.)। भाजपमध्ये जिल्ह्यातील इनकमिंग हे सत्तेची फळे चाखण्यासाठी असून, फळे संपली की ते निघून जाणार आहेत, याची पक्षश्रेष्ठींनाही गॅरंटी आहे. आयत्या पिठावर रेघोट्या ओढणार आहेत, असे मत आमदार सुभाष देशमुख यांनी माढा येथील लोकमंगल
Subhash deshamukha


सोलापूर, 6 नोव्हेंबर (हिं.स.)। भाजपमध्ये जिल्ह्यातील इनकमिंग हे सत्तेची फळे चाखण्यासाठी असून, फळे संपली की ते निघून जाणार आहेत, याची पक्षश्रेष्ठींनाही गॅरंटी आहे. आयत्या पिठावर रेघोट्या ओढणार आहेत, असे मत आमदार सुभाष देशमुख यांनी माढा येथील लोकमंगल पतसंस्थेच्या दिवाळी फराळ कार्यक्रमात व्यक्त केले.

श्री. देशमुख म्हणाले, आतापर्यंत माझा शंभर टक्के पाडण्यासाठीच वापर झाला. २००४ मधील सोलापूर लोकसभा, २००९ मधील माढा लोकसभा, २००९ मधील तुळजापूर विधानसभा, २०१४ ची दक्षिण विधानसभा निवडणुकीची त्यांनी उदाहरणे दिली. माढा शहराच्या पाणीपुरवठा योजनेसाठी मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक लावून प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.ईव्हीएमच्या आरोपाबाबत ते म्हणाले, विरोधकांना पराभव दिसू लागल्याने मतदारांना विचलित करत, दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे. यावेळी संचालक शहाजी साठे यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande