माजी आमदार भीमराव धोंडे ११ नोव्हेंबर रोजी करणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश
बीड, 6 नोव्हेंबर, (हिं.स.) पाटोदा, शिरूर कासार मतदारसंघाचे माजी आमदार आणि शिक्षणमहर्षी भीमराव धोंडे हे ११ नोव्हेंबर २०२५ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश करणार आहेत. मुंबईतील राष्ट्रवादी भवन येथे हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे.
माजी आमदार भीमराव धोंडे ११ नोव्हेंबर रोजी करणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश


बीड, 6 नोव्हेंबर, (हिं.स.) पाटोदा, शिरूर कासार मतदारसंघाचे माजी आमदार आणि शिक्षणमहर्षी भीमराव धोंडे हे ११ नोव्हेंबर २०२५ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश करणार आहेत. मुंबईतील राष्ट्रवादी भवन येथे हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार,

माजी आ. भीमराव धोंडे यांचा आष्टी, पाटोदा, शिरूर कासर विधानसभा मतदार संघात मोठा संपर्क आहे सत्ताधारी पक्षातील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रवेशाने येत्या काळात होणाऱ्या विविध निवडणुकां मधून याचा प्रत्यय येईल. यानिमित्ताने राजकीय समीकरणे मात्र नक्की बदलणार हे मात्र निश्चित ! आमदार धस यांच्यासमोर मोठे आव्हान असणार आहे.यांच्यासोबत ५०० कार्यकर्तेही पक्षात प्रवेश करतील.

या प्रवेशामुळे बीड जिल्ह्यासह राज्यभरात राजकीय चर्चेला उधाण आले आहे. धोंडे हे गेल्या ४० वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. त्यांनी समाजकारणाला प्राधान्य देत मतदारसंघात विकासाचे अनेक उपक्रम राबवले. शैक्षणिक संस्था, आरोग्य क्षेत्रातील महाविद्यालये, युवकांसाठी स्पर्धा,

व्यायामशाळा, कृषी महाविद्यालय सुरू केले. सध्या शेतकऱ्यांसाठी साखर कारखान्यासाठी संघर्ष करत आहेत. आष्टी विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande