कोल्हापूर : महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री यांच्यावरील चित्र प्रदर्शनास प्रारंभ
कोल्हापूर, 6 नोव्हेंबर, (हिं.स.)। राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागातंर्गत येणाऱ्या पुराभिलेख संचालनालयामार्फत राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्याशी संबंधित पुराभिलेख संचालनालयातील कागदपत्रांच्या प्रदर्शनास दसरा चौक येथील शहाजी
महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री संबंधित कागदपत्र प्रदर्शन


कोल्हापूर, 6 नोव्हेंबर, (हिं.स.)। राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागातंर्गत येणाऱ्या पुराभिलेख संचालनालयामार्फत राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्याशी संबंधित पुराभिलेख संचालनालयातील कागदपत्रांच्या प्रदर्शनास दसरा चौक येथील शहाजी छत्रपती महाविद्यालययाच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आज दिमाखात प्रारंभ झाला .

हे प्रदर्शन सर्वसामान्य नागरिकांसाठी सहा व सात नोव्हेंबर रोजी सकाळी दहा ते सहा या वेळेत मोफत सुरू राहणार आहे.जिल्हयातील जिज्ञासूंनी इतिहास अभ्यासकांनी,राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी ,तसेच तत्कालीन भारताच्या राजकीय इतिहासाचा मागोवा घेणाऱ्यांनी या चित्र प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन कोल्हापूर पुराभिलेखाचे प्रभारी सहाय्यक संचालक गणेशकुमार खोडके यांनी केले.या चित्र प्रदर्शनाला गुरुवारी इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत,ज्येष्ठ इतिहास अभ्यासक प्राचार्य जे.के पवार,प्राचार्य आर के शानेदिवाण,माजी नगरसेवक इंद्रजीत बोंद्रे,संजय आवळे,विक्रम रेपे वसंत मुळीक यांच्यासह शालेय विद्यार्थ्यांनी आणि इतिहास प्रेमींनी भेट दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande