मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थीच्या मागण्यांसाठी नाशकात बेमुदत उपोषण
नाशिक, 6 नोव्हेंबर (हिं.स.)। - राज्यांतील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजनेअंतर्गत कार्यरत असणाऱ्या १ लाख ३४ हजार प्रशिक्षणार्थीना तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून देण्याचे जे आश्वासन दिले होते, त्या
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थीच्या मागण्यांसाठी नाशकात बेमुदत उपोषण


नाशिक, 6 नोव्हेंबर (हिं.स.)।

- राज्यांतील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजनेअंतर्गत कार्यरत असणाऱ्या १ लाख ३४ हजार प्रशिक्षणार्थीना तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून देण्याचे जे आश्वासन दिले होते, त्याची पूर्तता न झाल्यामुळे या सर्व प्रशिक्षणार्थीवर उपासमारीची वेळ आली आहे. या गंभीर प्रश्री मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली प्रशिक्षणार्थीनी काल नाशिक येथे आंदोलन सुरू केले आहे.

मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी या आंदोलनाला सुरुवात झाली. सर्व प्रशिक्षणार्थी 'कुंभमेळा' स्वरूपात गोदावरी काठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या नामाचा जप करीत पायी आंदोलन स्थळाकडे निघाले. पंचवटी, तपोवन मठ, संत जनार्दन स्वामी चौक ते गोदावरी नदीकाठ या मार्गावरुन शिस्तबद्धपद्धतीने पायी चालत जाऊन सर्व प्रशिक्षणार्थी काळाराम मंदिर येथे पोहोचले. दर्शन घेऊन साकडे घातल्यानंतर तुकाराम बाबा यांनी गोदावरीत स्नान केले. त्यानंतर आंदोलनकर्ते मालेगाव स्टँड, रविवार कारंजा, महात्मा गांधी रोड, मेहेर सिग्नल, जिल्हाधिकारी कार्यालय, जुने सीबीएस, त्र्यंबक नाका मार्गे गोल्फ क्लब मैदान येथे बेमुदत आंदोलनासाठी बसले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande