लातूरात वाहतूक शिस्त व नियम तोडणाऱ्यांवर ई-चलन प्रणालीद्वारे होणार कडक कारवाई!
लातूर, 6 नोव्हेंबर (हिं.स.)। लातूर शहरात वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी आणि रस्त्यांवरील अपघात कमी करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी, लातूर शहर यांच्या कार्यालयाने ई-चलन प्रणालीचा प्रभावीपणे वापर सुरू केला आहे. सिग्नल तोडणे, ट्रिपल सीट, नो-एंट्रीमध्
लातूरात वाहतूक शिस्त व नियम तोडणाऱ्यांवर ई-चलन प्रणालीद्वारे होणार कडक कारवाई!


लातूर, 6 नोव्हेंबर (हिं.स.)।

लातूर शहरात वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी आणि रस्त्यांवरील अपघात कमी करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी, लातूर शहर यांच्या कार्यालयाने ई-चलन प्रणालीचा प्रभावीपणे वापर सुरू केला आहे. सिग्नल तोडणे, ट्रिपल सीट, नो-एंट्रीमध्ये प्रवेश करणे किंवा धोकादायक पद्धतीने वाहन चालवणे यांसारखे वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या वाहनधारकांवर यापुढे ई-चलन द्वारे कठोर कारवाई केली जाईल. शहरात लावलेले कॅमेरे, मोबाईल फोन आणि सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने नियम मोडणाऱ्या वाहनधारकांचे फोटो/व्हिडिओ पुरावे गोळा केले जातील.

​ प्रत्येक चुकीसाठी नियमानुसार ₹५०० ते ₹१,००० किंवा त्याहून अधिक दंड आकारला जाईल आणि ही रक्कम ई-चलन प्रणालीद्वारे वाहनधारकाच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे पाठवली जाईल.

​ऑनलाईन आणि ऑफलाईन भरणा हा दंड वाहनधारकांना ऑनलाईन (इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड/डेबिट कार्ड) किंवा ऑफलाईन (पोलीस स्टेशन/कोर्टात) भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.

सतत नियम तोडणे किंवा दंडाची रक्कम न भरणे अशा गंभीर प्रकरणांमध्ये संबंधित वाहनधारकांवर मोटार वाहन अधिनियम (M.V. Act) आणि भारतीय दंड संहिता (IPC) कलम १८८ नुसार गुन्हे दाखल केले जातील.

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande