
सोलापूर, 6 नोव्हेंबर (हिं.स.)। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्वीच मोहिते पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माळशिरस तालुक्यातील मोहिते पाटलांच्या सहकारी संस्थांच्या चौकशीचे आदेश दिले असल्याची खात्रीशीर माहिती समोर आली आहे. यामध्ये श्री शंकर सहकारी साखर कारखाना, सुमित्रा ग्रामीण बिगर शेती पतसंस्था, माळशिरस कृषी उत्पन्न बाजार समिती अकलूज येथील अनियमितिता, आर्थिक गैरव्यवहार याची चौकशी होणार असल्याचे सांगण्यात आले.
भारतीय जनता पार्टीचे नातेपुते मंडळ अध्यक्ष हरी पालवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना तीन वेगवेगळे निवेदन दिले आहेत.
श्री शंकर सहकारी साखर कारखाना लि, सदाशिवनगर कारखान्याचे चेअरमन रणजितसिंह मोहिते पाटील यांनी ऊसउत्पादक शेतकरी व कर्मचाऱ्यांवती केलेल्या अन्याय विरूद्ध चौकशी करावी,माळशिरस तालुक्यातील सुमित्रा ग्रामीण बिगर शेती या पतसंस्थेमध्ये आर्थिक घोटाळ्यांची मालिका सुरु असून बोगस कर्ज प्रकरणे दाखवून सामान्य शेतकरी व नागरिकांकडून जबरदस्तीने सुरु असलेल्या वसुलीची उच्च स्तरीय चौकशी समिती नेमून तत्कालीन चेअरमन जयसिंह शंकरराव मोहिते पाटील यांची चौकशी व्हावी अशा मागण्या केल्या आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड