मिलींद काळेश्वरकर याची सहआयुक्त पदी (औषधे) पदोन्नती
नांदेड, 6 नोव्हेंबर (हिं.स.)। मिलींद कृष्णराव काळेश्वरकर यांच्या कार्याची दखल घेत, सरकारने पदोन्नतीवर सहआयुक्त (औषधे) पदावर नागपूर येथे पदोन्नती केली आहे. नांदेड जिल्ह्यात अन्न व औषधी विभागात निरीक्षक म्हणून कार्य केलेले मिलींद काळेश्वरकर हे
मिलींद काळेश्वरकर याची सहआयुक्त पदी (औषधे) पदोन्नती


नांदेड, 6 नोव्हेंबर (हिं.स.)।

मिलींद कृष्णराव काळेश्वरकर यांच्या कार्याची दखल घेत, सरकारने पदोन्नतीवर सहआयुक्त (औषधे) पदावर नागपूर येथे पदोन्नती केली आहे.

नांदेड जिल्ह्यात अन्न व औषधी विभागात निरीक्षक म्हणून कार्य केलेले मिलींद काळेश्वरकर हे व्यक्तीमत्व म्हणून सर्वश्रूत आहेत. काळेश्वरकर यापूर्वी यवतमाळ येथे सहाय्यक आयुक्त(औषधे) कार्यरत होते. त्यांना राज्य सरकारने 31 ऑक्टोबर रोजी पदोन्नती देत, नागपूर येथे सहआयुक्त पदावर नियुक्त केले आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील रहिवासी असलेले मिलिंद काळेश्वरकर यांनी 1996 मध्ये आपली औषधी पदवी प्राप्त केल्यानंतर दहा वर्षे औषध उत्पादन कंपनीत छत्रपती संभाजी नगर येथे नोकरी केली. त्यानंतर त्यांनी यवतमाळ येथेच एक वर्ष ते दीड वर्ष डिप्लोमा इन फार्मसी कॉलेज मध्ये लेक्चरर म्हणून नोकरी केली . 2007 मध्ये सरळ सेवेने संभाजीनगर येथील पैठण तालुक्यातील ढाकेफळप्राथमिक आरोग्य केंद्रात औषध निर्माण अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. प्राथमिक आरोग्य केंद्रात नोकरी करीत असताना, 2012 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या औषधी निरीक्षक गट ब परीक्षेत नांदेड येथे पदावर प्रथम नियुक्ती झाली होती. त्यांनी नांदेडला असताना त्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने सर्व औषधी विक्रेत्यांच्या समस्या सोडविल्या वेळप्रसंगी शिष्टीने कडक नियमावली सुद्धा अवलंबले. एखाद्या वेळेस कुठे गैरप्रकार होत असतील, तर तेथे नियमानुसार शास्ति केली. तसेच त्यावेळी शिस्तप्रिय म्हणून नांदेडमध्ये काळेश्वरकर नावाचा चांगलाच दबदबा औषधी विक्रेत्यांच्या स्मरणात राहीला. त्यानंतर ते 2015 ते 2018 कालावधीत संभाजीनगर, 2018 ते 2020, यवतमाळ येथे औषधी निरीक्षक म्हणून कार्य केले. 2020 मध्ये ते सरळ सेवेने सहायक आयुक्त पदी पुन्हा एकदा संभाजी नगर येथे रुजू झाले.

त्यानंतर सहआयुक्त होण्यापूर्वी ते यवतमाळ येथे 2023 ते 2025 सहायक आयुक्त म्हणून पदावर कार्यरत होते. दरम्यान महाराष्ट्र सरकारने सहायक आयुक्त पदावरील पदोन्नतीवर सह आयुक्त पदी नियुक्ती दिलेली आहे.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande