
नाशिक, 6 नोव्हेंबर (हिं.स.)।
- राज्याचे मत्सव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी आज भोसला कॅम्पसला सदिच्छा भेट दिली. श्री.राणे यांनी भोसला मिलिटरी स्कूल, भोसला मिलिटरी स्कूल गर्ल्सबरोबरच कॅम्पसमधील कोंदडधारी राममंदीरास भेट देत दर्शन घेतले. सुरवातीला स्कूलजवळील शहीदर स्मारकांच्या ठिकाणी मंत्री रांणे यांना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर त्यांनी संस्थेचे संस्थापक धर्मवीर डॉ.बा.शि.मुंजे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष अँड.अविनाश भिडे, सहकार्यवाह माधव बर्वे, नाशिक विभागाचे अध्यक्ष इंजि. संजय पगारे यांनी राणे यांचे कॅम्पसमध्ये स्वागत केले. श्री.राणे यांनी सुरवातीला मुलांच्या स्कूलची पाहणी केली. त्यात स्मार्ट क्लास,मुंजे हॉल,संग्रहालय, मेस,अश्वशाळेचा समावेश होता, त्यानंतर जवळच असलेल्या मुलींच्या स्कूलची पाहणी करत दैनंदिन अभ्यास,स्कूलची रचना, सैनिकी शिक्षण,निवास,भोजन यासारख्या विषयांसह संस्थेच्या विविध उपक्रमांची पदाधिकाऱ्यांकडून तसेच शिक्षकांकडून सविस्तर माहिती घेतली. त्यानंतर बंदूकीच्या गोळ्या(मेटल) पासून तयार करण्यात आलेल्या कोंदधारी रामाच्या मुर्तीचे दर्शन त्यांनी घेतले, या मुर्तीबद्दल बरेच ऐकले होते मात्र पहिल्यांदाच प्रत्यक्ष दर्शन झाल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी नाशिक विभागाचे कोषाध्यक्ष राहुल वैद्य, सदस्य अँड.नागनाथ गोरवाडकर,कॅप्टन श्रीपाद नरावणे,मेजर विक्रांत कावळे आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV