नाशिक निवडणुकीची धुरा आ. राहुल ढिकलेंवर
जिल्ह्याचे चार भागात विभाजन नाशिक, 6 नोव्हेंबर (हिं.स.)। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या रणधुमाळीला शहरात सुरुवात झाली असून भारतीय जनता पक्षाकडून व्युहरचना रचण्यास सुरुवात झाल्याचे बघायला मिळत आहे. त्या अनुषंगाने निवडणूक प्रमुख आणि निवडणूक
नाशिक निवडणुकीची धुरा आ. राहुल ढिकलेंवर


जिल्ह्याचे चार भागात विभाजन

नाशिक, 6 नोव्हेंबर (हिं.स.)।

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या रणधुमाळीला शहरात सुरुवात झाली असून भारतीय जनता पक्षाकडून व्युहरचना रचण्यास सुरुवात झाल्याचे बघायला मिळत आहे. त्या अनुषंगाने निवडणूक प्रमुख आणि निवडणूक प्रभारींची नियुक्ती भाजपकडून करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्याचे चार विभागात विभाजन करण्यात आले आहे. नाशिक शहर, नाशिक दक्षिण, नाशिक उत्तर आणि मालेगाव याप्रमाणे निवडणूक प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

त्यानुसार नाशिक महापालिका निवडणुकीची जबाबदारी नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार अ‍ॅड. राहुल ढिकले यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. दरम्यान, नाशिक शहरात भाजपने १०० प्लसचा नारा दिला असून त्यादृष्टीने स्थानिक नेतृत्वाला बळकटी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातच आगामी सिंहस्थ कुंभमेळा आणि सर्वसामावेशक चेहरा म्हणून ढिकले यांच्याकडे शहराची जबाबदारी सोपविण्यात आल्याचे बोलले जात आहे.

त्याचबरोबर नाशिक उत्तरसाठी चांदवड- देवळा विधावसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. राहुल आहेर, नाशिक दक्षिणसाठी गिरीश पालवे तर मालेगावसाठी दादा जाधव यांची निवडणूक प्रमुख नियुक्ती करण्यात आली आहे. मतदारसंघाचा आढावा घेणे, प्रभागातील एकूण राजकीय स्थिती, उमेदवारांची चाचपणी, इच्छुकांच्या मुलाखती आदि जबाबदारी या प्रमुखांवर असेल. निवडणूक प्रमुख आपला आहवाल निवडणूक प्रभारींकडे सोपवतील. त्यानुसार उमेदवारांची निश्चिती करण्यात येईल.

असे असेल विभाजन

* नाशिक उत्तर-सुरगाणा, चांदवड, निफाड, येवला, नांदगाव

* नाशिक दक्षिण-दिंडोरी, पेठ, इगतपुरी, सिन्नर

* नाशिक ग्रामीण- मालेगाव

* नाशिक शहर-नाशिक महापालिका कार्यक्षेत्र

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande