चिपळूणमधील भातशेतीचे पंचनामे सरसकट करावे : शौकत मुकादम
रत्नागिरी, 6 नोव्हेंबर, (हिं. स.) : भातशेतीचे पंचनामे जिओटॅगिंगने करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्याऐवजी सरसकट पंचनामे करावेत, अशी मागणी चिपळूणचे माजी सभापती शौकत मुकादम यांनी केली आहे. ते म्हणाले, कापणी केलेले अर्धेअधिक भात पावसात भिजुन गेल्या
शौकत मुकादम


रत्नागिरी, 6 नोव्हेंबर, (हिं. स.) : भातशेतीचे पंचनामे जिओटॅगिंगने करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्याऐवजी सरसकट पंचनामे करावेत, अशी मागणी चिपळूणचे माजी सभापती शौकत मुकादम यांनी केली आहे.

ते म्हणाले, कापणी केलेले अर्धेअधिक भात पावसात भिजुन गेल्यामुळे शेतात भातशेतीचे फोटो कसे काढणार? कमी कालावधीमध्ये येणारे भात पिकाला पावसामुळे कापणी करून शेतात वाळवणे शक्य नसल्यामुळे जशी जमेल तशी कापणी करण्यात आली आहे. महान पिकाची कापणी पूर्णता शेतात पडून मोड आले आहेत. जिओ ट्रेकिंगने फोटो न घेता सरसकट पंचानामे करावेत.

ते म्हणाले, महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये कोणत्याही शेतीचे नुकसान झाले, तर फक्त पाच गावांचा सर्व्हे करून सरसकट नुकसानभरपाई दिली जाते. मग कोकणासाठी वेगळे निकष कशासाठी? शेतीच्या नुकसानीबरोबर पावसाचे पाणी शेतामध्ये साठून राहिल्यामुळे तूर, पावटा, कडवा, मूग यांची पेरणी करता येत नसल्यामुळे काही भागामध्ये काही शेतकऱ्यांचे दुबार पिकाचे नुकसान झाले आहे. याचाही विचार व्हायला हवा.

नोव्हेंबरमध्येही पाऊस लागत असल्यामुळे हापूस आंब्याच्या, काजूच्या झाडाच्या बुंध्यांमध्ये पाणी साठून राहल्यामुळे झाडांच्या मोहरावर परिणाम होणार आहे. त्यामुळे नुकसानभरपाई देतीवेळी या सर्व गोष्टींचा विचार झाला पाहिजे, असेही मुकादम म्हणाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande