
पुणे, 6 नोव्हेंबर (हिं.स.)।
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुपुत्र पार्थ पवार यांच्यावर पुण्यातील कोरेगाव पार्कमधील एका जमीन खरेदी प्रकरणात घोटाळ्याचे आरोप होत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी पार्थ पवार यांच्यावर आरोप केले आहेत. १८०० कोटींची जमीन ३०० कोटींना खरेदी करण्यात आल आणि केवळ ५०० रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरण्यात आल्याचे दानवे यांनी दावा केला आहे. दरम्यान हे प्रकरण चर्चेत असताना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत चौकशी निर्देश दिले असून तहसीलदार आणि दुय्यम निबंधकाचे निलंबन करण्यात आले आहे.
या प्रकरणात पुणे प्रकरणात अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेत चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी सर्व माहिती मागितली आहे,सर्व माहिती आणि प्राथमिक चौकशीच्या आधारवर मी भाष्य करेन या प्रकरणासंदर्भात मी सर्व माहिती मागवली आहे. महसूल विभाग, आयजीआर, लँड रेकॉर्ड्स याची सर्व माहिती मागितली आहे. योग्य ते चौकशीचे आदेश दिल्याचे त्यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु