
सोलापूर, 6 नोव्हेंबर (हिं.स.)। स्थानिक स्वराज्य संस्थेतील नगरपालिका निवडणुकीची बिगुल वाजले. महिन्यापूर्वी बैठक घेऊन निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे संकेत देणाय्रा खा.प्रणिती शिंदे यांनी ऐन निवडणुकी दरम्यान पाठ फिरवल्याने सेनापती नसल्यास सैन्य लढाई कशी करणार याबाबत काँग्रेस गोटात चिंतेचा सूर व्यक्त होऊ लागला.
2024 च्या लोकसभा निवडणुकीत खासदार झालेल्या प्रणिती शिंदे यांना या मतदारसंघातून तब्बल 45 हजाराचे मताधिक्य मिळाले. हेच मताधिक्य त्यांच्या विजयाला कारणीभूत ठरल्यामुळे ते वर्षभर सातत्याने गाव भेट दौऱ्याच्या निमित्ताने तालुक्यातील अनेक गावाला भेटी देत त्याचे प्रश्न समजून घेत आहेत. दोन महिन्यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक घेतली. मात्र गेले महिनाभरापासून काँग्रेसने मंगळवेढा नगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर अद्याप बैठक घेतली नाही विशेषता त्यांचा मित्रपक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस शरद 'पवार पक्षाने देखील नुकतीच बैठक घेतली.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड