‘पीएमआरडीए’ हद्दीतील बांधकाम परवानग्यांवर आता काटेकोरपणे लक्ष ठेवले जाणार
पुणे, 6 नोव्हेंबर (हिं.स.)। पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) हद्दीतील बांधकाम परवानग्यांवर आता काटेकोरपणे लक्ष ठेवले जाणार आहे. बांधकाम मंजुरीसाठी अर्ज आलेल्या स्थळांची प्रत्यक्ष पाहणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यानुसार सहा
PMRDA


पुणे, 6 नोव्हेंबर (हिं.स.)। पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) हद्दीतील बांधकाम परवानग्यांवर आता काटेकोरपणे लक्ष ठेवले जाणार आहे. बांधकाम मंजुरीसाठी अर्ज आलेल्या स्थळांची प्रत्यक्ष पाहणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यानुसार सहायक नगररचनाकार (एटीपी) प्रत्यक्ष तपासणी करणार आहेत. त्‍यामुळे अनधिकृत बांधकामांना चाप बसेल, अशी अपेक्षा प्रशासनाने व्यक्त केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून वाघोली, हिंजवडी परिसरासह महानगर क्षेत्रातील बांधकामांबाबत अनेक तक्रारी ‘पीएमआरडीए’कडे दाखल झाल्या आहेत. यामध्ये बांधकाम व्‍यावसायिकांनी नियमानुसार कामे न करता नागरिकांची फसवणूक केल्‍याच्या तक्रारींचा समावेश अधिक होता. आता अशा प्रकारांबाबत कारवाई सुरू केली आहे. पूर्वी बांधकाम मंजुरी घेताना ‘पीएमआरडीए’ला केवळ दोन ओळींचे पत्र दिले जात होते. त्याआधारे वास्तूविशारदाला (आर्किटेक्ट) मंजुरी दिली जात होती. शिवाय, बांधकाम नियमानुसार असल्याचा उल्लेख करून परवानगी दिली जायची. प्रत्यक्ष स्थळपाहणी केली जात नव्हती. अशा पद्धतीने मंजुरी दिल्याने अनियमित बांधकामांना प्रोत्साहन मिळत असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले. शिवाय, नागरिकांच्या तक्रारीही आल्या होत्या.त्यानुसार ही नियमावली लागू करण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande