
रत्नागिरी, 6 नोव्हेंबर, (हिं. स.) : रत्नागिरी जिल्हा नगरपालिका प्रशासन जिल्हा सहआयुक्त आणि राजापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार बाबर यांची पुणे महापालिकेच्या उपायुक्तपदी पदोन्नतीने बदली झाली आहे. त्यांच्या रिक्त झालेल्या पदावर कोल्हापूर महापालिकेचे सहाय्यक आयुक्त जयंत जावडेकर यांची नियुक्ती झाली आहे.
तुषार बाबर गेली काही वर्षे रत्नागिरीचे मुख्याधिकारी होते. त्यांच्याकडे रत्नागिरी जिल्हा नगरपालिका जिल्हा सहआयुक्त पदाचाही पदभार होता. त्यांनी रत्नागिरीबरोबरच लांजा नगर पंचायत आणि राजापूर पालिकेच्या मुख्याधिकारीपदीही काम केले होते.
आपल्या कार्यकाळात त्यांनी जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगर पंचायतींच्या विविध विकासकामांना गती देण्याचा प्रयत्न केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी