रस्ता रोको स्थगित, हर घर हर खेत काला झेंडा अभियान - भगवान बोराडे
नाशिक, 6 नोव्हेंबर (हिं.स.)। 10 नोव्हेंबर पासून महाराष्ट्रव्यापी होणार सर्व कर्जदार शेतकरी आपल्या घरावर आणि शेतात काळा झेंडा लावून सरकारचा निषेध करणार, अशी माहिती शेतकरी संघटना समन्वय समिती महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष भगवान बोराडे यांनी आज बै
रस्ता रोको स्थगित  , हर घर हर खेत काला झेंडा अभियान    - बोराडे


नाशिक, 6 नोव्हेंबर (हिं.स.)। 10 नोव्हेंबर पासून महाराष्ट्रव्यापी होणार सर्व कर्जदार शेतकरी आपल्या घरावर आणि शेतात काळा झेंडा लावून सरकारचा निषेध करणार, अशी माहिती शेतकरी संघटना समन्वय समिती महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष भगवान बोराडे यांनी आज बैठकीत दिली.

निवडणुकीच्या आधी प्रत्येक पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांना फक्त करून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे मात्र शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्यास टाळाटाळ करीत आहे या गोष्टीचे सरकारला स्मरण व्हावे म्हणून 10 नोव्हेंबरला शेतकरी कर्जमुक्ती समन्वय समितीतर्फे महाराष्ट्र व्यापी रास्ता रोको आंदोलन जाहीर केले होते परंतु आचारसंहिता लागल्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले मात्र सरकार जोपर्यंत शेतकरी कर्जमुक्ती करीत नाही तोपर्यंत हर घर काला झेंडा हर खेत काला झेंडा या अभियानाची व्याप्ती महाराष्ट्रभर करणार असल्याची माहिती भगवान बोराडे यांनी दिली नाशिक जिल्हा बँकेचे कर्ज एकत्रित कुटुंब च्या नावे असल्यामुळे शेतकऱ्यांनी दहा टक्के रक्कम भरणा करून तरीपण त्यांना बँकेकडून खाते फोड करण्यासाठी जे पत्र विकास सोसायटी यांना दिले पाहिजे ते पत्र बँकेने न दिल्यामुळे शेतकऱ्यांचे मानसिक स्वास्थ्य बिघडत आहे आणि खाते फोड न झाल्यामुळे घरातील कुटुंब चालकावर आत्महत्या ची वेळ आली आहे या शेतकऱ्यांनी दहा टक्के रक्कम भरणा केली अशा शेतकऱ्यांना जिल्हा बँकेने त्वरित खाते फोड करण्यासाठी सोसायटी यांना पत्र देण्यात यावे यासाठी माननीय प्रशासक संतोष बिडवे यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना कर्ज वसुलीचा तगादा नोटिसा पाठवू नये असे राज्य शासनाने जाहीर केले असूनही बँक शेतकऱ्यांना जमिनी जप्तीच्या आणि लिलावाच्या नोटीसा पाठवीत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या घरचे मानसिक स्वास्थ बिघडल्याने शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत आहे.

बैठकीसाठी समिती अध्यक्ष भगवान बोराडे 938 आदिवासी विकास संस्था सोसायटी समिती अध्यक्ष कैलास बोरसे काँग्रेस कमिटी कार्यकारणी सदस्य दिलीप पाटील भारत स्वाभिमान पार्टीचे अध्यक्ष मोती नाना पाटील नामदेव बहिरम अशोक देशमुख स्वप्निल सावंत दिनकर निकम रथी पाटील किरण गवारे भागवत अहिरे उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande